प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशा संबंधी काही महत्त्वाचे विचारले जाणारे प्रश्न (एफ ए क्यू)*
First Year Polytechnic Diploma admission 2023-24 FAQ

 *चॉईस कोड काय असतात आणि ते केव्हा भरायचे आहेत?* 


चॉईस कोड म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजेच ब्रँच आणि कॉलेजची निवड करण्याचा फॉर्म भरणे 
हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो 
यासाठी आपण प्रत्यक्ष जालना पॉलिटेक्निकला आल्यास आपल्याला निश्चित मदत होईल


 *ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस कोड किती तारखेला भरायचे आहेत?* 


ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस कोड किंवा पसंती कोड हे आपल्याला दिनांक 23 जुलै ते 26 जुलै 2023 दरम्यान भरायचे आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरायची आहे.
🌷🌹

 *मेरिट लिस्ट केव्हा जाहीर होणार आहे?* 

मेरिट लिस्ट ही दोन 
प्रकारची असते. पहिली म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा तात्पुरती मेरिट लिस्ट आणि दुसरी म्हणजे अंतिम मेरिट लिस्ट.
 तात्पुरती मेरिट लिस्ट 17 जुलै रोजी सायंकाळी जाहीर होईल आणि अंतिम यादी 21 जुलै रोजी जाहीर होईल.
🌷🌹

 *ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस कोड भरल्यानंतर ची प्रक्रिया काय असते?*


 यानंतर दिनांक 28 जुलै रोजी प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज आणि कोणती शाखा मिळाली हे ऑनलाइन जाहीर होते. ते पाहण्यासाठी आपल्याला लॉगिन करावे लागते.
🌷🌹

 *एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड वन मध्ये काहीच अलॉटमेंट झालेलं नसेल तर काय करावे?* 


अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड दोन साठी पुनश्च ऑप्शन फॉर्म म्हणजे चॉईस कोड भरावे. त्याची तारीख आपल्या शेडूल मध्ये दिलेली आहे.
🌷🌹

 *कॅप राऊंड वन मध्ये आपल्याला आपल्या पसंतीप्रमाणे शाखा आणि कॉलेज मिळाले नसेल तर काय करावे?* 
अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड वन मध्ये मिळालेल्या शाखेला आणि कॉलेजला राखीव ठेवण्यासाठी आणि कॅप राऊंड दोन ला जाण्यासाठी बेटरमेंट हा पर्याय निवडावा आणि सीट एक्सेप्ट करावी.
🌷🌹

 *एखाद्या विद्यार्थ्याचे काही कागदपत्रे अजूनही अपलोड होऊ शकतात का?*


 निश्चितच होऊ शकतात. त्यासाठी दिनांक 18 जुलै आणि 19 जुलै रोजी आपणास प्रत्यक्ष जालना पॉलिटेक्निक मध्ये यावं लागेल.
🌹🌷

 *एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड वन मध्ये मनाप्रमाणे शाखा आणि कॉलेज मिळालं असेल त्यांनी काय करावं?* 


अशा सर्व विद्यार्थ्यांनी जे कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन आपली ओरिजनल कागदपत्रे दाखवून आणि फी भरून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यांना पुढच्या राऊंडसाठी जाण्याची गरज नाही.
🌹🌷

 *एकूण किती कॅप राऊंड आहेत?*

 मित्रांनो एकूण तीन कॅप राऊंड आहेत. आता दिनांक 23 ते 26 जूलै दरम्यान आपण कॅप राऊंड वन चे ऑप्शन फॉर्म भरणार आहोत.
🌷🌹

 *विद्यार्थी आपल्या घरूनच किंवा आपल्या गावी ऑप्शन फॉर्म भरू शकतात का?* 

होय निश्चितच भरू शकतात. मोबाईलवर सुद्धा भरू शकतात. इंटरनेट कॅफेवर जाऊन भरू शकतात. परंतु जर काळजीपूर्वक आणि अचूक भरायचे असतील तर जालना पॉलिटेक्निक मध्ये येऊन सुविधा केंद्रामध्ये फॉर्म भरून घ्यावा. 
🌷🌹

 *मेरिट लिस्ट लागल्यावर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावामध्ये किंवा गुणांमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये काही चूक असल्यास काय करावे?* 

 कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा चूक असल्यास अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जालना येथे दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी येऊन भेटावे. तशा प्रकारची दुरुस्ती करून देण्यात येईल.
🌷🌹


 *विद्यार्थ्यांना प्रवेशा संबंधी पूर्ण माहिती किंवा वेबसाईट कोणती आहे?*


 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची वेबसाईट म्हणजे dtemaharashtra.gov.in या website वर जाऊन Post SSC admission या लिंक वर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

https://poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23/index.php/login_controller/check_session
🌷🌹

*विद्यार्थ्याने सुरुवातीला ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला होता आता त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट किंवा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे तर बदल होईल का आणि केव्हा?*


 निश्चितच बदल शक्य आहे. सुरुवातीला जरी आपण ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तरी दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी आपण सदर ओरिजिनल प्रमाणपत्र घेऊन या आणि  जालना पॉलिटेक्निक मध्ये आपल्याला ते प्रमाणपत्र अपलोड करता येईल आणि आपल्या फॉर्ममध्ये कॅटेगरी बदल करता येईल.
🌹🌷


 *एखादा विद्यार्थी किती ऑप्शन किंवा चॉईस कोड भरू शकतो?* 


कोणताही विद्यार्थी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 चॉईस कोड म्हणजे ऑप्शन्स भरू शकतो
🌹🌷
 *चॉईस कोड किंवा ऑप्शन कोड म्हणजे काय?* 

चॉईस कोड किंवा ऑप्शन कोडत् म्हणजे एक नंबर असतो. ज्यामध्ये कॉलेजचा क्रमांक आणि ब्रँच क्रमांक मिळून तो तयार होतो. त्यालाच आपण ऑप्शन कोड असं म्हणतो. 
उदाहरणार्थ
201419110 म्हणजे जालना पॉलिटेक्निक मधील सिविल ब्रँच
201424510 म्हणजे जालना पॉलिटेक्निक मधील कम्प्युटर ब्रँच

*आपण फक्त एकाच कॉलेजचे किंवा एका शाखेचे चॉईस कोड टाकू शकतो का?*

निश्चितच आपण किती कॉलेजचे आणि किती शाखेचे कोड टाकायचे ते स्वतः ठरवत असतो. चॉईस कोड हे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 पर्यंत भरू शकतो. यामध्ये महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी कॉलेजमधील कोणत्याही शाखेसाठी आपण चॉईस कोड भरू शकतो.
🌹🌷 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees