सेवापुस्तकात(Service-Book)घेतल्या जाणाऱ्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या नोंदी Government Employee Service Book Important Notes

 

सेवापुस्तकात(Service-Book)घेतल्या जाणाऱ्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या नोंदी



मित्रानो आजकाल प्रत्येकजण सरकारी नौकरी च्या शोधात आहे त्यासाठी अपार मेहनत व जिद्दीने तयारी देखील करत आहेत परंतु मित्रांनो हीच सरकारी  नौकरी  स्वीकारल्या नंतर त्यामधील बारकावे तसेच आपले कर्तव्य व जवाबदाऱ्या ,शासन नियम यांचे पालन देखील करणे गरजेचे असते कारण शासन म्हणजे आपण असतो म्हणून सरकारी नोकरदाराने समाजामध्ये वावरताना व समाजमाध्यमांमध्ये काही गोष्टी share करताना अतिशय जवाबदारीपूर्वक आणि काळजीपूर्वक गोष्टी share करायला हव्यात तसेच नेहमी सतर्क राहायला असणे गरजेचे आहे.

    जेव्हा एखादा व्यक्ती सरकारी नौकरी स्वीकारतो तेव्हा त्याला त्याच्या वयाच्या ५८-६० वर्षापर्यंत शासनास सेवा द्यावी लागते त्यादरम्यान त्याला अनेक शाकीय कामकाजाचे ज्ञान प्राप्त होते ,त्याच्या प्रत्येकगोष्टी ची नोंद घेतली   जाते.सरकारी कर्मचार्याची नोंद ज्या पुस्तकात घेतली जाते ते पुस्तक म्हणजे त्याचे सेवा पुस्तक . मित्रांनो  आपण सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकाला त्याची कुंडली असे सुद्धा म्हणू शकतो कारण यामध्ये सरकारी कर्मचारी  शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून ता तो सेवानिवृत्त होई पर्यंत प्रत्येक गोष्टी ची नोंद ह्या सेवापुस्तकात घेतली  जाते .  मित्रानो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने आपले सेवा पुस्तक दर सहा महिन्यांनी आपल्या आस्थापना शाखेच्या लिपिक जवळ जाऊन आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली जाते का नाही याची तपासणी केली पाहिजे.

चला तर मग जाणून घेऊ या आपण कोण कोणत्या गोष्टींची नोंद तपासली पाहिजे ते ...

1] अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव

2] सध्याचे पदनाम

3] मुळ नियुक्ती दिनांक

4] सेवार्थ आयडी

5] मुळ पदनाम

6] पहिल्या पानावरील सर्व नोंदी

7] जन्म तारीख नोदींची पडताळणी

8] जातीच्या नोंदीची पडताळणी

9] वैदयकीय तपासणीची नोंद

10] पूर्व चारित्र्य पडताळणी नोंद

11] स्वग्राम बाबत घोषणा पत्र

12] गट विमा योजनेचे सभासद कधीपासून झाले ते वर्ष व त्यानंतर वेळोवेळी गट विमा योजनेमध्ये वाढ झाल्याच्या नोंदी.

 

13] खालील नामनिर्देशन सेवापुस्तकात घेण्यात आले आहेत कि नाही याची तपासणी करणे

  • Ø भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन नोंद (G.P.F)
  • Ø मृत्यु नि सेवा उपदान नामनिर्देशन नौद (DCRG)
  • Ø गट विमा योजना नामनिर्देश नोंद (GIS)
  • Ø कुटूंब निवृत्ती वेतन नामनिर्देश नोंद (Family Pension)
  • Ø समुह वैयक्तीक अपघात विमा योजना नामनिर्देश नौद (Accidental Policy)

14] मराठी भाषा - हिंदी भाषा परिक्षा सुट प्रमाणपत्र सेवा पुस्तकास जोडले आहे का आणि त्याची नोंद सेवापुस्तकात झाली आहे का?

15] कुटूंबाचा तपशिल नोंद सेवापुस्तकात झाली आहे का?

16]  निष्ठेचे शपथपत्र

17] NPS खाते क्रमांक नोंद प्रथम पृष्ठावर घेण्यात आली आहे का?

18] परिविक्षाधीन नियुक्ती असल्यास परिविक्षा कालावधी समाप्त झाल्याची नोंद

19] सेवा प्रवेशोत्तर परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद

20] अर्हताकारी/विभागीय परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद

21] स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद

22] शासन मान्य संस्थेकडील संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याची नोंद (MSCIT)

23] कालबध्द पदोन्नतीचा लाभ मंजुरीची नोंद व वेतन

24] छोटे कुटुंब प्रमाणपत्र

25] पहिला व दुसरी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ मंजुरीचा व वेतन निश्चितीची नोंद

26] सावेआ नुसार तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुरीची व वेतन निश्चितीची नोंद

27] सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद

28] बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद तसेच  कार्यमुक्त/ हजर/ पदग्रहण अवधी नोंद

29] रजा प्रवास सवलत नोंद

30] नियमित पदोन्नतीची/ आश्वासित प्रगती योजना व त्यानुषंगाने केलेल्या वेतन निश्चितीची नोंद

31] आगाव वेतनवाढ मिळालेबाबतची नोंद व वेतननिश्चितीची नोंद

32] नियुक्तीपासुन आज अखेर प्रत्येक वर्षी वार्षिक वेतनवाढी  मंजुर करणेत आलेबाबतच्या नोंदी

33]  मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जात / प्रवर्ग / जात वैधता प्रमाणपत्राची नोंद

34] रजा लेखा अदययावत असल्याबाबतची खात्री करणे

35] सेवा पडताळणी अभिलेख अदययावत असल्याबाबतची खात्री करणे

36] दुय्यम सेवापुस्तक अदयावत करुन दिलेले असल्याबाबतची खात्री करणे

37] सेवा पुस्तकामधील पहिला पृष्ठावरील नोंदी दर पाच वर्षांनी पडताळणी केले बाबतची नोंद

38] सेवा कालावधीमध्ये निलंबित असल्यास त्याबाबतची नोद

  • Ø निलंबन कालावधी समाप्त झालेला बाबतची नोंद
  • Ø निलंबन कालावधी नियमित झालेला बाबतची नोंद

39] पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजुर करुन दिलेला असल्यास असा मानीव दिनांक मंजुर करुन देण्यास सक्षम असलेल्या प्राधिका-याची आदेशाची नोंद व प्रत

40] अधिकारी/ कर्मचारी गैरहजर असेल/ असाधारण रजेवर असेल/ निलंबीत असेल तर त्यापुढील वेतनवाढी विनियमित केल्याचा आदेशाची नोंद व प्रत

41] अतिप्रदानाची वसुली असल्यास त्याबाबतची नोंद

42] सेवा कालावधीमध्ये घेतलेल्या अग्रीमाचा तपशिल

43] अग्रिमाचा तपशिल / व्याजाची वसुली नोंद

44] घरबांधणी अग्रीम घेतला असल्यास त्याबाबतची नोंद

45] संगणक अग्रिम घेतला असल्यास त्याबाबतची नोंद

46] मोटार सायकल अग्रिम घेतला असल्यास त्याबाबतची नोंद

47] मोटार कार अग्रीम घेतला असल्यास त्याबाबतची नोंद

48] अधिकारी / कर्मचा-यास शिक्षा झाली असल्यास त्याबाबतची अधिकारी नोंद

49] वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.

50] शैक्षणिक अर्हता

51] नियुक्ती आदेश

52] स्वीयेतर सेवा हजर / कार्यमुक्त दिनांक

53] कमाल टप्पा / एकाकी पव वेतननिश्चिती

54] अर्जित / परावर्तित रजा दर ६ महिन्यास जमा केल्या आहेत काय ?

55] वेतन आयोग रकमा ५ हप्ते प्रदान केल्याच्या नोंदी

56] सेवाखंड / सेवाखंड क्षमापित केल्याच्या नोंदी

57]  अनधिकृत गैरहजेरी नोंद

58] महिला कर्मचा-यांचे बाबतीत विवाहानंतर नाव बदलाची नोंद किंवा इतर कारणाने नावात बदल नोंद

59] स्त्री कर्मचारी यांनी वैदयकिय लाभास्तव आई, वडील / सासु, सासरे यांची निवड केल्याची नोंद अतिप्रदान रक्कम वसुली

60]  वेतन पडताळणी पथकाकडून वेतननिश्चिती तपासणीची नोंद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees