सविस्तर जाणून घ्या निवृत्तीवेतनाचे प्रकार मराठी मध्ये -Pension Types in Detail for Maharashtra Government Employees in Marathi Language

 


निवृत्तीवेतनाचे प्रकार

१) पुर्णसेवा निवृत्तीवेतन

२) नियत वयोमान निवृत्तीवेतन

३) रुग्णता निवृत्तीवेतन

४) भरपाई निवृत्तीवेतन

५) जखम किंवा इजा निवृत्तीवेतन

६) अनुकंपा निवृत्तीवेतन

७) स्वेच्छा सेवानिवृत्तीवेतन

८) कुटुंब निवृत्तीवेतन

 

1] पुर्णसेवा निवृत्ती वेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम नियम ६४ व ६५   नुसार

अ) ३० वर्षांची अर्हताकारी सेवा पुर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी तीन महिन्याची अगाऊ नोटीस देऊन किंवा तीन महिन्याचे अगाऊ वेतन व भत्ते वेऊन लगेच लोकहिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करू शकतात.

 ब) राजपत्रित अधिकाऱ्याची ५० वर्षे पुर्ण व अराजपत्रित कर्मचाऱ्याचे ५५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी ३ महिन्याची अगाऊ नोटीस देऊन किंवा ३ महिन्याचे अगाऊ वेतन व भत्ते वेऊन लगेच कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करू शकतात. वरील प्रकरणात कर्मचाऱ्याला जे सेवानिवृत्ती वेतन देतात त्याला पुर्णसेवा निवृत्तीवेतन असे म्हणतात.

2]नियत वयोमान निवृत्ती वेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम ६३ नुसार

नियत वयोमान नुसार सेवानिवृत्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांची वयाची कमाल मर्यादा ठरविण्यात आली आहे. ती पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होऊन मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला नियतवयोमान निवृत्तीवेतन म्हणतात.

अ) वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यासाठी - ६० वर्षे

ब) वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यासाठी व त्यावरील कर्मचाऱ्यासाठी - ५८ वर्षे

ज्या महिन्यात वरीलप्रमाणे वय कर्मचारी पुर्ण करतील त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्होत्तर तो कर्मचारी सेवानिवृत्त होईल.

v  वरील गोष्टीस अपवाद म्हणजे जर कर्मचाऱ्याची जन्मतारीख महिन्याची १ तारीख असेल तर अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्होत्तर तो  कर्मचारी सेवानिवृत्त होईल असे समजावे.

 

3]रुग्णता निवृत्ती वेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम नियम ६८ ते ८०  नुसार

Ø शासकीय कर्मचारी मानसिक किंवा शारिरीक विकलांगतेमुळे शासकीय कामाकरीता असमर्थ असल्याचे नियम ७२ मधील विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियत वयोमान होण्यापूर्वी सेवानिवृत्त होण्यास परवानगी देण्यात आली तर त्या शासकीय कर्मचान्यास रुग्णता निवृत्तीवेतन मिळते.

Ø शासकीय कर्मचाऱ्याची असमर्थतता ही वाईट सवयीचा परिणाम म्हणून झाली * असल्यास रुग्णता निवृत्तीवेतन मिळणार नाही.

Ø वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित केल्याच्या तारखेपासुन ७ दिवसांच्या आंत सेवानिवृत्त करणे आवश्यक आहे.

Ø ५ व्या वेतन आयोगानुसार ज्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन रु. ७२०० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय मंडळ इतरांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकीत्सक प्रमाणपत्र देण्यास सक्षम आहे. (शासन निर्णय दिनांक १५/२/२००६)

4] भरपाई निवृत्तीवेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम ८१ ते ८४ नुसार

कर्मचान्याचे स्थायीपद नाहिसे केल्यामुळे किंवा त्या पदाच्या कर्तव्याच्या स्वरुपामध्ये बदल झाल्यामुळे कर्मचान्यास कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास कर्मचान्यापुढे दोन पर्याय-

१) अगोदर केलेल्या सेवेबद्दल त्याला मिळण्याचा हक्क असेल असे कोणतेही भरपाई निवृत्तीवेतन किंवा उपदान घेणे.

२) दुसऱ्या आस्थापनेवर दुसरी नियुक्ती किंवा कमी वेतनावरील बदली स्विकारणे आणि पुर्वीची सेवा निवृत्तीवेतनासाठी हिशोबात घेण्याचे चालू ठेवणे वरील पर्याय एकमध्ये कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या निवृत्तीवेतनास भरपाई निवृत्तीवेतन म्हणतात.

 

 

5]जखम किंवा इजा निवृत्तीवेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२  ८५ ते ९९  नुसार

* कर्मचारी पदाची कर्तव्ये पार पाडतांना शासकीय कर्मचान्यास जखम किंवा इजा झाली व तो काम करण्यास असमर्थ झाल्यास अशा परिस्थितीत शासनाच्या मान्यतेने त्या कर्मचान्यास देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनास जखम किंवा इजा निवृत्तीवेतन असे म्हणतात.

* हे निवृत्तीवेतन शासनाने निश्चीत केलेल्या कालावधीसाठी देण्यात येते. विकलांगता आणि तीव्रता पुढे किती काळ चालू राहील, याची पडताळणी करून मुदतवाढ दिली जाते. यासाठी ३ वर्षातून एकदा नमुना नं. २६ मध्ये जिल्हा शल्यचिकीत्सक किंवा वैद्यकीय मंडळ यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

* हे निवृत्तीवेतन नियमित निवृत्तीवेतनाच्या ७५% एवढे मिळेल.

6]अनुकंपा निवृत्तीवेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२  १०१ नुसार

* सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय नाही. परंतू शासन विशेष बाब म्हणून त्याला भरपाई निवृत्तीवेतनाप्रमाणे निवृत्तीवेतन व उपदान मंजूर करू शकते.

१) दोन तृतीयांश पेक्षा जास्त निवृत्तीवेतन मंजूर करता येणार नाही.

२) शासनाने निश्चीत केलेल्या किमान निवृत्तीवेतनापेक्षा कमी नसावे. (किमान निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगा प्रमाणे- रु ७५००/-)

३) बडतर्फ शासकीय कर्मचारी अनुकंपा निवृत्तीवेतनास पात्र नाही.

 

7) स्वेच्छा सेवानिवृत्तीवेतन:

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२  ६६ नुसार

* शासकीय कर्मचारी २० वर्षाची अर्हताकारी सेवा पुर्ण झालेनंतर नियुक्ती प्राधिकाऱ्यास तीन महिन्याची (नव्वद दिवसाची) लेखी नोटीस देऊन सेवानिवृत्त होऊ शकतो. त्याला मिळणाऱ्या निवृत्तीवेतनास स्वेच्छा सेवानिवृत्तीवेतन असे म्हणतात.

 

* नोटीस नियुक्ती प्राधिकाऱ्याने स्वीकारली पाहिजे.

* शासकीय कर्मचारी इच्छित सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी नोटीस मागे घेऊ शकतो. मात्र सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिली पाहिजे.

* शासकीय कर्मचाऱ्याच्या इच्छेनुसार तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीची नोटीस वित्त विभागाच्या सहमतीने नियुक्ती प्राधिकारी स्विकारू शकतो.

 

8]कुटुंब निवृत्तीवेतन :

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२  १९६ नुसार

१ वर्षाची सतत सेवा झाल्यानंतर कर्मचारी मृत्यू पावला

* १ वर्षाची सतत सेवा पुर्ण होण्यापूर्वी वैद्यकीय प्राधिकाऱ्याने तपासणी करून

कर्मचान्यास सक्षम ठरवल्यानंतर कर्मचारी मृत्यू पावला सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन घेत असलेल्या कर्मचान्याचा मृत्यू झाला.

 

१) सेवेत असताना मृत्यु झाल्यास :- तर त्याच्या पात्र वारसांना मासिक दराने मिळणारे वेतन म्हणजे कुटुंब निवृत्तीवेतन.

अ) मृत्युच्या दिनांका पासुन १० वर्ष वाढीव दराने अंतिम मुळ वेतनाच्या ५०%

व) तद्नंतर सर्वसाधारण दर - अंतिम मुळ वेतनाच्या ३० %

सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास :- मृत्यु पावाल्याच्या दिनांकापासून ७ वर्ष किंवा हयात असता तर वयाची ६५ वर्ष पुर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जो आगोदर येईल तो पर्यंत ५०% व त्यानंतर ३०% दराने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees