GIS गट विमा योजना (GROUP INSURANCE SCHEME)

 


GIS गट विमा योजना (GROUP INSURANCE SCHEME-राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२.)

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२.

   शासन निर्णय वित्त विभाग क्र.DOI 2081/4701/ADM-5  दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचार्यांना दि.१ मे १९८२ मध्यान्पूर्व पासून “गत विमा योजना लागू करण्यात आली असून ती सक्तीची केल्यामुळे पात्र ठरविण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचा-याला या योजनेमध्ये वर्गणी भरणे अनिवार्य केले आहे.

   जिल्हा परिषदेच्या आस्थापने वरील कर्मचा-याना ती दिनांक १ आक्टोबर १९९० पासून सक्तीने लागू करण्यात आली आहे. तसेच शासन मान्य अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, त्यांच्या अंतर्गत येणारी अनुदानित महाविद्यालये, महाविद्यालये, नगर परिषदा, महानगर पालिका, इत्यादिना दिनांक १ मे १९८२ पासुन सक्तीने  लागू केली आहे.

परिच्छेद २ : उद्देश : कर्मचारी सेवेत असतांना त्याला मृतू आल्यास त्यांच्या कुटुंबांना मदत व्हावी आणि सेवा निवृत्तीनंतर त्याला मिळावव्याच्या उत्त्पनात वाढ व्हावी म्हणून त्याला काही ठोक रकम देता यावी अशा दुहेरी लाभासाठी विम्याचे संरक्षण देता यावे असे या कमी खर्चाच्या आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी अशा योजनेचे हे उदिष्ट आहे.

परिच्छेद :३ : योजना लागू होणे :- खाली नमूद केलेल्यांना हे योजना लागू करण्यात आलेली नाही.

             (अ) कंत्राटी कर्मचारी,

             (ब) केंद्र शासन, इतर राज्य शासने आणि सार्वजनिक क्षेत्रातील  किवा इतर

                   स्वायत्त संस्था,        निम  सरकारी संस्था यांच्या कडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या व्यक्ती.

      (क) अंशकालीन व तदर्थ कर्मचारी.

      (ड) नैमतिक कामगार व कर्मचारी,

      (इ) वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत भरती करण्यात

              आलेल्या व्यक्ती.

      (फ) तात्पुरती व्यवस्था म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती  

      (ग) कार्यव्ययी कर्मचारी,

      (ह) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर पुनर्नियुक्त केलेल्या व्यक्ती. (*)

      (*) शा.नि.वी.वी.क्र.ग.वी.यो-११८३/प्रक्र-६६/८४/प्र.क्र.५ दि.२८/२/१९८६ अन्वये समाविष्ट.

 

परिच्छेद – ४ सदस्यत्व:- दि.१ मे १९८२ रोजी सेवेत असलेल्या सर्व कर्मचा-याना वयाची अट लक्ष्यात न घेता या योजनेचे सभासदत्व बहाल करण्यात आलेले होते. त्यानंतर मात्र नव

                                                                 

नियुक्त कर्मचा-याला  योजनेच्या वर्धापन दिनापासून सभासद म्हणून दाखल करून घेण्यात येत आहे. वर्धापन दिन प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारी रोजी घोषित करण्यात आलेला आहे. कार्यालय प्रमुखाने सभासद करून घेण्यात आल्याचे असे आदेश पारित करून सबंधित सेवकाच्या सेवा पुस्तीकात नोंद घ्यावी. नोंद घेणे अनिवार्य आहे. उदा. दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ रोजी रुजू झालेल्या कर्मचा-यास दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी सदस्यत्व बहाल करण्यात येते.

 

परिच्छेद ५.१:- सदस्याची वर्गणी:-

योजनेची वर्गणी ही  युनिटा  प्रमाणे आकारण्यात  आलेली आहे. प्रत्त्येक युनिट  रु.६० चा  असून माहे जानेवारी २०१६ पासून गट  विमा योजनेची वसूल कराव्याच्या मासिक वर्गणीचे दर शासन निर्णय. वित्त विभाग,  क्रमाक ग.वि.यो.२०१५/प्रक्र.४७/विमा प्रशासन दि. ३० जानेवारी २०१६ अन्वये विहित केलेले असून प्रत्येक गटाकरीता देय होणारी विमा निधीची व बचत निधीची अंशदानाची रक्कम खाली नमूद केलेल्या विवरणातील स्तंभ १ ते ३  मध्ये नमूद केलेल्या प्रमाणे असून सेवेत असतांना कर्मचारी अचानक निधन पावल्यास त्याच्या उत्तराधिका-याला द्यावयाची विमा निधीची रकम स्तंभ ४ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

 

स्तंभ – १

स्तंभ – २

स्तंभ – ३

स्तंभ – ४

कर्मचा-या प्रवर्ग / गट

दि.१ जानेवारी २०१६ रोजी नियमित सेवेत असलेल्या कर्मचा—याच्या मासिक वेतनातून वसूल करावयाची बचत निधीची वर्गणी (रु.)

दि.२ जानेवारी २०१६ आंणी त्यानंतर प्रत्येक वर्षी कोण त्याही महिन्यात नव्याने प्रविष्ट झालेल्या व पात्र असलेल्या कर्मचा-याच्या  वेतनातून वसूल करावयाचा केवळ विमा संरक्षणाचा हप्ता रक्कम. (रु.)

सेवेत असतांना कर्मचा-याला मृत्यू आल्यास कुटुंबियांना देय होणारी विम्याची रक्कम. (रु.)

गट “अ”

९६० (नउशे साठ रुपये)

३२० (तीनशे वीस रुपये)

९,६०,००० (नउ लाख साठ हजार रु.)

गट “ब”

४८० (चारशे ऐंशी रु.)

१६० (एकशे साठ रु)

४,८०,००० (चार लाख ऐंशी हजार रु.)

गट “क”

३६० (तीनशे साठ)

१२० (एकशे वीस रु)

३,६०,००० (तीन लाख साठ हजार रु.)

गट “ड”

२४० (दोनशे चाळीस)

८०  (ऐंशी रु.)

२,४०,००० (दोन लाख चाळीस हजार रु).

कालबद्ध पदोन्नती योजने अंतर्गत किवा सेवांतर्गत आश्वाशित प्रगती योजने करिता वरिष्ठ वेतन श्रेणीच्या अनुषंगाने त्याच्या मुळ पदाचा विचार न करता वर्गणी वसूल करण्यात येते. तसेच वरील वर्गातील वेतन श्रेणीचे पद कनिष्ठ गटात अंतर्भूत झाल्यास मासिक वर्गणीचा दर पूर्वीच्याच वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणे ठेवण्यात येतो आणि कर्मचा-यांना त्या दरा प्रमाणेच विमा निधीची रक्कम देण्यात येते. उदा: गट “क ” मधील एखाद्या कर्मचा-याला आश्वासित / कालबद्ध प्रगती योजनेकरिता गट “ब” पदाची वेतन श्रेणी लागू केली असेल तर त्याचेकडून गट “ब” चे पदास लागू असलेली रु.४८० या दराने वर्गणी वसूल करण्यात येते पुढे जर त्याला पुन्हा गट “ब” च्या वेतनश्रेणी मधून गट “क” च्या वेतनश्रेणीमध्ये अंतर्भूत केले तरी गट “ब” च्या पदाचीच (रु.४८०) वर्गणी कपात करणे सुरु ठेवण्यात येते.

माहे जानेवारी २०१६ रोजी किवा त्या नंतर सेवा निवृत्त झालेल्या कर्मचा-याला किवा शासकीय सेवेत असतांना त्याचे निधन झाले असेल तर त्याच्या वारसाला शा.नि.वि.वि.क्र. ग.वी.यो.२०१५/प्रक्र.४७/विमा प्रशासन दि. ३० जानेवारी २०१६ अन्वये लाभ देण्यात येतो मात्र थकबाकीत गेलेली वर्गणीची रक्कम एक रकमी प्रदान करावयाचे वेतन देयकातून निधीच्या दराने व्याज लाऊन वळती करून घेण्यात येते.  

 एखाद्या कर्मचा-यास एका वर्गातून दुस-या वर्गात नियमितपणे बढती मिळाल्यास योजनेच्या पुढील वर्धापन दिनापासून (१ जानेवारी पासून) त्यांच्या वर्गणीत त्याला ज्या वर्गात बढती मिळाली असेल त्या वर्गाच्या समुचित पातळीप्रमाणे वाढ करण्यात येते. वर्धापन दिनांकापर्यंत (३१ दिसेम्बर पर्यंत) तो पदोन्नतीच्या पूर्वीच्या पदास लागू असलेल्या दरानेच वर्गणी भरेल. तसेच अशी बढती मिळण्यापूर्वी विम्याचे संरक्षण म्हणून जेवढी रक्कम मिळण्यास तो पात्र असेल तेवढीच रक्कम मिळण्यास तो पुढील वर्धापन दिनापर्यंत पात्र असेल.

समजा एखाद्या चतुर्थ (गट “ड”) वर्गातील कर्मचा-यास माहे मार्च २०१६  मध्ये नियमितपणे वर्ग् ३ (गट  “क”) मध्ये बढती मिळाली असेल तर त्यास सन २०१६ च्या माहे डीसेम्बर पर्यंत दरमहा रु.२४०/- या दरा प्रमाणेच वर्गणी द्यावी लागेल आणि तो पर्यंत तो फक्त रु.२,४०,०००/- इतक्याच रकेमेचे विम्याचे संरक्षणास पात्र राहील. माहे जानेवारी २०१७  पासून मात्र त्यास “योजनेचे” सभासद करून घेण्यात आल्यानंतर त्याची वर्गणी दरमहा रु.३६०/- एवढी होईल आणि तो (दुर्दैवाने त्यास मृत्यू आल्यास) रु.३,६०,००० एवढ्या विमा निधीच्या रकमेस पात्र राहील.

परिच्छेद ६.१ :- सद्स्याखेरीज इतर कर्मचा-यासाठी हप्त्ते व विम्याचे संरक्षण :-  

      प्रत्येक वर्षी ०२ जानेवारी नंतर येण्या-या जानेवारी महिन्याखेरीज दुस-या एखाद्या महिन्यात सेवेत नव्याने दाखल होणा-यां कर्मचाऱ्यांना ते सेवेत दाखल झाल्याच्या तारखेपासून योजनेचे सदस्य होणा-या तारखेपर्यंत (माहे दिसेम्बर पर्यंत) विम्याच्या संरक्षणासाठी खाली नमूद केलेल्या रकाना क्र ३ मध्ये नमूद केलेल्या विमा निधीच्या दराने वर्गणी दिल्यावर त्यांना रकाना क्र ०४ मध्ये नमूद केलेल्या दराने विम्याचे समुचित लाभास त्याचा उत्तराधिकारी पात्र समजण्यात येतो.

अ.क्र.

कर्मचाराच्या गट

विम्याच्या हप्त्ताची दरमहा रक्कम (माहे जानेवारी.२०१६ पासून)रुपये

समुचित विम्याची प्रदेय रक्कम. रुपये

१)

“अ”

३२०

९,६०,०००

२)

“ब”

१६०

४,८०,०००

३)

“क”

१२०  

३,६०,०००

४)

“ड”

 ८०  

२,४०,०००

 

एखादी व्यक्ती सेवेत दाखल झाल्यानंतर लगेच तिला विम्याचे संरक्षण ताबडतोब उपलब्ध व्हावे या उद्येशानेच त्याचे कडून उपरोक्त दराने विमाचा हप्ता वसूल करण्यात येतो. हि व्यवस्था केवळ सेवेच्या पहिल्या वर्षा करीताच विहित केली आहे. बचत निधीचे संपुर्ण  लाभ त्याला योजनेच्या पुढील वर्धापन दिनांकापासून उपलब्ध करण्यात येतात.  बचत निधीचा लाभ आणि  विम्याचे संरक्षण असा दुहेरी लाभ योजनेच्या पुढील वर्धापन दिना पासून उपलब्ध होतो.    

परिच्छेद ७.१:- सद्स्यासाठी विमा निधी व विम्याचे संरक्षण:-

      योजनेच्या प्रत्येक सदस्यास विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी वर्गणीचा काही भाग राज्य शासनाच्या लोकलेखा (Public Account) मध्ये जमा घेण्यात येतो. सेवेत असतांना कोणत्याही कारणाने जे कर्मचारी दुर्दैवाने मृत पावतील त्यांच्या उत्तराधिका-याला या लेख्यातून विम्याचा लाभ देण्यात येतो.

७.२: मृत कर्मचा-याचे उत्तराधिका-याला विम्याची रक्कम देण्यासाठी वर्गणी मधून गोळा केलेल्या रकमेचा काही भाग शासनाच्या लोकलेख्या मध्ये जमा केल्यानंतर त्यातील धन किवा ऋण शिलक रकम डाक कार्यालय बचत बँकेच्या ठेवीवरील सध्याच्या व्याजाच्या दराने हिशोब करून त्या व्याजासह यथास्थिती जमा किवा नावे टाकण्यात येते.

परिच्छेद ८.१: बचत निधी :-

      वर्गणीची शिल्लक रक्कम (लोकलेख्याच्या विमा निधी मध्ये व्याजासह जमा केल्यानंतर) बचत निधीमध्ये जमा करण्यात येते. या रकमेवरील व्याजासह ती लोक लेख्यामध्ये शासन स्तरावरून जमा घेण्यात येते. शासनाने सेवेतून काढून टाकलेले, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले, नियत वयोमानाने निवृत्त झालेले, सेवेत असतांना मृत पावलेले इ.या पैकी कोणत्याही कारणाने ज्या दिवशी सेवेत नसतील त्या दिवशी बचत निधी मधून प्रदान करण्यात येते.  

८.२ बचत निधी मधून देय असलेल्या लाभाच्या रक्मेचे विवरण (टेबल) व्याजाचा दर निश्चित करून शासन दरवर्षी जाहीर करते. कर्मचारी ज्या दिवशी सेवेत नसेल त्या महिन्याच्या अखेर पर्यंतची वर्गणी वसूल करण्यात आली असे गृहीत धरून विहित केलेल्या दराचे व्याज जोडून सदर विवरणामध्ये रकमा दर्शविण्यात येतात. सदर तक्ता हा वर्गणीच्या एका युनिटा करिता (रु.६०) तयार करण्यात येतो त्यामुळे कर्मचा-याला प्रदेय असलेल्या बचत निधीच्या लाभाचे प्रदान युनिटाच्या संखेप्रमाणे करावयाचे आहे. म्हणजे गट “क” च्या बाबतीत वर्गणीच्या तक्त्यातील रकमेस २ ने गुणाकार करावयाचा आहे तर गट “ब” आणि गट “अ” च्या बाबतीत अनुक्रमे ८ आणि १६ ने गुणाकार करावयाचा आहे.   (सध्या सेवार्थ प्रणाली मध्ये बचत निधीच्या रकमेचे प्रदान करण्या करिता Software उपलब्ध केले आहे त्यामुळे manually गणिती पद्धत अवलंबून आवश्यकता नाही.

परीछेद ९.१ ते  ९.८  वर्गणीची वसुली:-

(१)   सभासद करून घेतल्यानंतर त्या महिन्याच्या १ ल्या तारखेला कामाच्या नेहमीच्या तासाच्या प्रारंभीच वर्गणी देय ठरते.

(२)   सेवेच्या पहिल्या डिसेंबर महिन्यापर्यंत विमानिधी व जानेवारी पासून बचत निधीच्या दराने वर्गणी वेतन देयकातून कपात करण्यात येते.

(३)   तो सेवेत असल्याचे ज्या महिन्यात बंद झाले त्या संपुर्ण महिन्याची वर्गणी वेतनामधून कापून घेण्यात येते. तो कामावर आहे, रजेवर आहे कि निलंबित आहे हे लक्षात न घेता वर्गणी वसूल करण्यात येते.

(४)   मात्र कर्मचारी असाधारण रजेवर असेल व वेतन मिळण्यास पात्र नसेल तेव्हा त्या महिन्याची वर्गणीची वसुली तो कामावर रुजू झाल्यावर व्याजासह करण्यात येते.

(५)   वेतनाचे प्रदानास प्रशासकीय कारणामुळे विलंब झाला असेल तेव्हा वर्गणीच्या रकमेवर व्याज आकारण्यात येत नाही.

(६)   मृत पावलेल्या कर्मचार्याकडे वर्गणीची रकम थकीत असेल तेव्हा ती उत्त्राधीकार्या कडून रोख स्वरूपात वसूल करण्यात येते. अथवा ते अश्यक्य असल्यास उत्तराधीका-याला प्रदेय ठरत असलेल्या अंतिम प्रदानाच्या देयका मधून वळती करण्यात येते. त्या साठी विमा निधीच्या दरास लागू असलेले व्याज आकारण्यात येते.

(७)   परसेवेत किवा प्रतिनियुक्तीवर पाठ्विण्यात आलेल्या कर्मचा-याचे बाबतीत प्रतिनियुक्तीवर घेण्या-या प्राधिकरणाने /परकीय मालकीने वर्गणीची वसुली शासकीय कोषागारात यथायोग्य शिर्षकाखाली चलनाद्वारे भरणा केल्यावर चलनाची एक प्रत सदर कर्मचा-याच्या मुळ  विभागाकडे पाठविण्यात यावी. कोणत्याही वेळी वर्गणी थकबाकीत गेल्यास २ ते ३ हप्त्यात वसूल करण्यात येते. मुल विभाग प्रमुखाने प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्याचे सर्व अभिलेख उदा. नमुना , किवा २  मध्ये निर्गमित केलेले सदस्यत्व, विम्याचे आदेश नमुना क्र. ८ सेवा पुस्तिकेतील नोंदी, नामनिर्देशन इत्यादी अद्यायवत ठेवावयाचे आहेत. 

 

(८)   प्रतिनियुक्तीचे आदेश निर्गमन करताना सेवेच्या अटीमध्ये योजनेच्या वर्गणीच्या वसुली बाबतचा असा आशय समाविष्ट करण्यात येतो. मूळ विभागाचा प्रमुख प्रतिनियुक्तीवरील कर्मचा-याचे वर्गणीच्या वसुलीवर लक्ष ठेवतो.

 

(९)   एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात बदली झालेल्या कर्मचा-याचे बाबतीत सदस्याच्या नमुना क्र. ८ चा उतारा पूर्वीच्या विभाग प्रमुखाने नवीन प्रमुख कडे पाठवावयाचा असून त्याची पोच पावती मागवावी. नवीन विभाग प्रमुखाने त्याच्या कार्यालयात तयार करण्यात आलेल्या नमुना क्र.८ मधील नोंद्वाहीमध्ये योग्य ती नोंद घ्यावी व पुढील कपात सुरु करावी.  

 

 

         परिच्छेद १०.१: सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीमधून योजनेच्या वर्गणीस पैसा   

                      पुरविणे :-

 

 

            एखाद्या कर्मचा-यास  या योजनेची वर्गणी देऊ शकत नसलयास एक विशेष बाब वा

    स्वतंत्र व्यवहार म्हणून योजनेच्या एका वर्ष्याच्या वर्गणी एवधी  रकम भ.नि.नि. चा ना

    परतावा उचलीची रकम (Non refundable advance) म्हणून काढण्याची परवानगी देण्यात येते.

आयकराच्या प्रयोजनाकरिता कर्मचा-याचे एकूण उत्पन्न लक्ष्यात घेतांना या योजनेची वर्गणी, आयुर्विमाचा हप्ता, भविष्य निर्वाह निधीचे अंशदान इत्यादीसाठी अनुज्ञेय मर्यादे पर्यंत वाजव्तीचा भाग असेल. मात्र भविष निर्वाह निधी मधून उचल करून वर्गणीच्या थकबाकीचे हप्त्ते भरलेले असतील तर ती रकम आय्काराकरिता सुत म्हणून धरता येत नाही.

परिच्छेद कर.११.१ : विमा निधी/बचत निधीमधून रकमेचे प्रदान:- 

   नियत वयमान पूर्ण झाल्यावर सेवा निवृत्त झालेल्या अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे सेवेत नसलेल्या कर्मचा-याचे सेवा पुस्तीकेमधिल नोंदी वरून तो या योजनेचा सदस्य आहे याची खात्री करून कार्यालय प्रमुख सदर कर्मचा-याकडून प्रपत्र कर.३ मध्ये माहिती भरून घेतल्यानंतर त्याला बचत निधीमध्ये संचित झालेल्या रकमेस मंजुरी देण्यास सक्षम आहे व त्याप्रमाणे मंजुरीचे विहित नमुन्या मधील आदेश काढतो.

११:२   सेवेत असतांना मृत पावलेल्या कर्मचा-याचे सेवा वारसाला फक्त् विम्याच्या संरक्षणाचा लाभ द्यावयाचा असल्यास वारसाचा नमुना क्र.४ पाठविण्यात येतो व त्याचे कडून नमुना क्र.५ मध्ये अर्ज भरून घेण्यात आल्यावर विमा निधी आणि बचत निधी मध्ये संचित झालेल्या रकमेस मंजुरी देण्यास कार्यालय  प्रमुखांना अधिकार देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ते विहित नमुन्यात मंजुरीचे आदेश काढतात. मात्र सेवा पुस्तिकेतील नोंदी वरून तो या योजनेचा सदस्य आहे याची खात्री करून ही कारवाई करण्यात येते.

११:३ मृत कर्मचा-याचे वारसास फक्त विम्याच्या संरक्षणाचीच रकम देय ठरत असेल र्तेव्हा कर्मचा-याच्या वर्गास अनुज्ञेय असलेल्या रकमेचेच प्रदान देण्यात येते. ही  तरतूद जो कर्मचारी योजनेचा सदस्य नसेल तेव्हा लागू पडते. समजा “गट क” मधील एखादा दि.२९ फेब्रुवारी २०१६ रोजी रुजू झालेला कर्मचारी २९ आगस्त २०१६ रोजी अचानक मृत पावला तर त्याचे वारसास रु.३,६०,०० येवढ्या विम्याचे रकमेचा लाभ देण्यात येतो.

११.४ (अ) योजनेचे सदस्यत्व दिलेल्या मृत कर्मचा-याच्या वारसाला / व्यक्तीला पुढीलप्रमाणे बचत निधीमधून रकम प्रदेय ठरते.

अ) कर्मचा-याच्या मृत्यूसमयी त्यास विम्याची जी रकम मिळण्याचा हक्क असेल ती रक्कम अधिक;

ब) त्याच्या सर्वात खालच्या वर्गातील सदस्यत्वाचा संपुर्ण  कालावसाठी बचत निधीतून त्याला देय होणारी रककम आणि;

क) वरच्या वर्गात नियुक्ती केल्यामुळे, बढती दिल्यामुळे त्याच्या वर्गणीत प्रत्येक वेळी जेवढ्या युनिटमध्ये वाढ झाली असेल त्या ज्यादा युनिटामुळे त्याच्या वर्गणीत  वाढ केल्याच्या तारखेपासून त्याच्या मृत्युच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत त्याला देय होणारी रकम. 

११.५: राजीनामा, सेवानिवृत्ती इ. कारणामुळे जो कर्मचारी सेवेत राहणार नाही, त्यास खालील प्रमाणे रक्कम देय ठरते.

अ) त्याच्या सर्वात खालच्या वर्गातील सद्स्यतवाचा संपुर्ण  कालावधीसाठी बचत निधीतुन त्यास देय होणारी रक्कम आणि;

ब) वरच्या वर्गात नियुक्ती केल्यामुळे / बढती दिल्यामुळे वर्गणीदाराच्या वर्गणी मध्ये अशा प्रकारे वाढ केल्याच्या तारखेपासून त्याचे सदस्यत्व संपुष्टात येण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत त्याला देय होणारी बचत निधीची रक्कम.

उदा. दि.२९ फेब्रुवारी २००० रोजी नव्याने रुजू झालेल्या गट “ब” मधील अधिका-यास   दि.१ जानेवारी २००१ रोजी सभासद करून घेतले. त्यास नियमितपणे दि.२७ एप्रिल २०१४  रोजी गट “अ” मध्ये पदोन्नती दिल्यामुळे पुन्हा दि.१ जानेवारी २०१५ रोजी गट “अ” मध्ये  सदस्यत्व दिले. सदर अधिकारी दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी सेवा निवृत्त झाल्यास त्याला बचत निधीचा लाभ खालील प्रमाणे परीगणित करण्यात येईल. (बचत निधीचे दर सन २०१५ साठी लागू असलेल्या शा.नि.वित्त विभाग क्र.गावियो-२०१५/प्रक्र-५/विमा प्रशासन दि.१६ मे २०१५ सोबत जोडलेल्या टेबल प्रमाणे घेतले आहेत. उदा.

 

 

कालावधी

बचत निधीचा दर.

वर्गणीचे युनिटे

एकूण रक्कम.

जाने.०१ ते डीसे.१५  

९०१०

 ८ (आठ)

९०१०X८= ७२०८०

जाने.१५ ते डीसे.१५ 

५२४

१६ - ८(*) =   

 ५२४X८=  ४१९२

                                    एकूण बचत निधी  ... ... ...  ७६,२७२

(*) ८  युनिटे वजा करण्याचे कारण कि निवृतीच्या तारखेपर्यंत ८ युनिटाचा लाभ दिलेला आहे.

तथापि ह्याच अधिका-याला दि.३१ डिसेंबर २०१५ रोजी मृत्य आला असता तर बचत निधीच्या शिवाय त्याच्या उत्तराधीका-याला विमा निधीची रक्कम रु.९,६०,००० सुद्धा प्रदेय ठरली असती.

११:६ वर्गणी वसूल होण्यापूर्वीच एखाद्या महिन्यात मृत्यु आल्यास ज्या महिन्यात कर्मच्या-याला मृत्यू आलेला असेल त्या संपूर्ण महिन्याची (मृत्यूची तारीख लक्ष्यत न घेता) वर्गणी रोखीने वारसाकडून वसूल करण्यात येते अथवा वारसाला देय असलेल्या रकमेतून कापून घेण्यात आल्यावर निव्वळ देय रक्कम प्रदान  करण्यात येते.

११:७ सेवेत असलेला एखदा कर्मचारी मागाहून भारतीय प्रशासकीय सेवेत  (IAS/IPS/IFS ) इ.सेवेत रुजू झाला तर भारत सरकारचे वित मंत्रालय ठरवील त्याप्रमाणे त्याचे प्रकारे नियमित करण्यात येते.

 

 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees