डेटा सायंटिस्ट म्हणजे काय? What is Data Scientist? ROLE OF DATA SCIENTIST

 

डेटा सायंटिस्ट म्हणजे काय?



 एखाद्या व्यवसाय अथवा ऍप्लिकेशन वा इंटरनेट चालू असताना तयार होत जाणाऱ्या माहितीचा वापर करून त्या व्यवसायास अथवा ऍप्लिकेशन ला वृद्धिंगत करणे म्हणजे डेटा सायन्स. डेटा सायन्स लाच डिसिजन सायन्स असेही म्हणतात. एखादे सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा तुम्ही एक खानावळ चालवता. काही दिवस व्यवसाय चालवून तुमच्या लक्षात येते की तुमची खानावळ फक्त दुपारी १ते ३ व रात्री ८ ते १० संपूर्ण भरातं चालते कारण तीच साधारण सर्वांची जेवणाची वेळ असते आणि सुट्टी सुद्धा. पण इतर वेळी ती म्हणावी अशी चालत नाही. आता या माहितीचा वापर करून तुम्ही चपाती बनवणाऱ्या काकूंना दिवसभर रोजगार देण्याऐवजी फक्त दिवसात ४ तास काम दिले. भाज्या गरम करण्याचा कालावधी ठरवला. वीज वापर योग्य वेळेत केला. भांडी घासन्यासाठी काकू फक्त सकाळी बोलावल्या. हे सर्व उपाय केल्यावर तुम्ही तुमचा बदलता खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) कमी केलात व नफा सुद्धा. तसेच अजून काही उपाय आहेत जसे की इतर वेळेत थाळी वर डिस्काउंट देणे इत्यादी इ. यात वेळेची माहिती काढणे याला फाइंडिंग (finding) असे म्हणतात,ती वेळ तशी का असणे याला इन्साईट (insight) म्हणतात तर चपाती वाल्या काकूंची वेळ ठरावण्याला डिसिजन मेकिंग (decision making) असे म्हणतात. अशाच पध्दतीने इतर व्यावसायिक समस्या डेटा सायन्स छा वापर करून सोडवू शकता

 

भारतातील डेटा सायन्स ची रोजगार क्षमता

 

डेटा सायंटिस्ट ची गरज सर्वच क्षेत्रात आहे आणि असणार आहे. बरं असेही नाही की डेटा सायन्स नवीनच क्षेत्र आहे. औषधनिर्मिती उद्योगात औषधाची परिणामकारकता व बँका त्यांची उधरीची जोखीम (क्रेडिट रिस्क) ठरवण्यासाठी गेली ४० ते ५० वर्षे डेटा सायन्स चा वापर करत आहेत. वर्तमान काळात, ई- व्यवहार ची चलती आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रात डेटा सायन्स वापरले जाते. तसेच भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स अतिशय महत्वाचे आहे. काल परवा माझ्या वाचनात असे आले की भारतात २०१९ मध्ये ९७००० डेटा सायंटिस्ट च्या जागा रिकाम्या जागा राहिल्या आहेत. यावरून तुम्हीच ठरवा की येत्या काळात डेटा सायंटिस्ट ची किती गरज भासणार आहे ते.

 

डेटा सायन्स बनण्यासाठी लागणारी सक्षमता

 

गरज आणि पुरवठा यामध्ये दुआ साधण्यासाठी आजकाल खूप सारे कोर्स चालू झाले आहेत. एक इंजिनिअर म्हणून तुम्ही सक्षम तर आहात पण एवढ्यात भागणार नाही. तुम्हाला डेटा हाताळायचे ज्ञान प्राप्त करावे लागेल. त्यामध्ये SQL, R programming तसेच python शिकावं लागेल. तसेच डेटा लागेल त्या चित्रारुपत सादर करावे लागेल, त्यासाठी Excel, Tableau यासारखे टूल शिकावे लागतील .त्याबरोबर संख्याशास्त्र ही शिकावे लागेल. हे सर्व तुम्हाला कोण्याही कोर्स मध्ये शिकायला मिळेल. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनुभव, आजकाल अनुभव शिवाय कोणीच विश्वास ठेवत नाही हे मान्य करावे लागेल आणि कंपन्यांना सुद्धा उमेदवार चाळण्या साठी अनुभवाची चाळण लावतात कारण त्यांच्याकडे डेटा सायन्स शिकवणारे कोणी नसते. आता तुम्ही विचाराल की पाहिले नोकरी तर मिळू दे मगच अनुभव येईल ना. नाही!

 

एक लक्षात घ्या आजकाल चे जग हे खूप स्पर्धेचे आहे. डेटा सायन्सच काय पण कुठल्याच क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने यश मिळणार नाही. तुम्हाला जगाच्या एकही पाऊल मागे राहून चालणार नाही. आपली शिक्षण पद्धती रोजगारक्षम नाही. मी डेटा सायन्स च्यां अनुषंगाने काय करायचं ते सांगू शकतो.

 

सर्वप्रथम डेटा सायन्स बद्दल खोलवर जाणून घ्या. इंटरनेट वर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. थोडीफार का होईना पण प्रोग्रामिंग आपल्याला येईल का हे जाणून घ्या. संख्याशास्त्र ची आवड आहे का ते तपासा. हे सर्व ठीक वाटत असेल तरच पुढे जा नाहीतर वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातील. दोन्ही गोष्टी खूप मौल्यवान आहेत. एखादा कोर्स एन्रोल करा, इंटरनेट वर तुम्हाला अभ्यासक्रम व रेटिंग मिळतील मोजमाप करायला. शक्यतो ऑनलाईन कोर्स टाळा, शिक्षक समोर असण्याचा फरक पडतो आणि फसणुकीपासून सुद्धा वाचाल. सर्वात महत्वाची गोष्ट, या जगात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही. वरील कोर्स करत असताना अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करा. इंटरनेट वर kaggle.com वर तुम्हाला डेटा सायन्स चे प्रकल्प प्रतियोगिता (प्रोजेक्ट कम्पिटिशन) मध्ये भाग घेऊ शकता तसेच freelancing चा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे ज्यात तुमची कमाई सुद्धा होते. हे सर्व चालू असताना आपला रिसुमे आणि LinkedIn profile बनवा. त्यात वरचे सगळे खटाटोप रीतसर मांडा. सोबतच अश्या कंपन्या शोधा ज्यात डेटा सायंटिस्ट ची गरज आहे. त्यांना मुलाखती साठी अर्ज करत रहा. हार मानू नका, यश हमखास मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees