कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे काय ?त्याची पात्रता काय?ते कोणाकोणाला मिळू शकते ? Family Pension ...Eligiblility All info

कुटुंब निवृत्ती  वेतन म्हणजे काय ?

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नियम ६२ व ११६ अन्वये, ३१ डिसेंबर १९६३ रोजी सेवेत असलेल्या व त्यानंतर सेवेत असलेल्या व किमान एक वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यास जर सेवेत असतांना मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबियांना हे निवृत्तीवेतन मंजूर केले जाते. तसेच कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी होवून त्याला सेवेसाठी पात्र ठरविलेले असून एक वर्षाची सेवा पूर्ण होण्यापूर्वी त्याचा मृत्यू ओढविल्यास, किंवा सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांना हे सेवानिवृत्तीवेतन मंजूर केले जाते.

आहर्ता :-

1समजा १ वर्षाची अखंड सेवा झाल्यानंतर कर्मचारी मृत्यू पावला.

2] १ वर्षाची सतत सेवा पुर्ण होण्यापूर्वी वैद्यकीय प्राधिकाऱ्याने तपासणी करून कर्मचाऱ्यास सक्षम ठरवल्यानंतर कर्मचारी मृत्यू पावला.

3] सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

वरील तीन कारणांमुळे फॅमिली पेन्शन म्हणजेच कुटुंब निवृत्ती वेतन मिळते 

जर कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन घेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ...

त्याच्या पात्र वारसांना मासिक दराने खालील प्रमाणे वेतन म्हणजे कुटुंब निवृत्तीवेतन मिळते .


अ) मृत्युच्या दिनांका पासुन १० वर्ष वाढीव दराने अंतिम मुळ वेतनाच्या ५० %

 ब) त्यानंतर सर्वसाधारण दर - अंतिम मुळ वेतनाच्या ३० %

 सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास :- मृत्यु पावाल्याच्या दिनांकापासून ७ वर्ष किंवा हयात असता तर वयाची ६५ वर्ष पुर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जो आगोदर येईल तो पर्यंत ५०% व त्यानंतर ३०% दराने.

कुटुंब निवृत्तीवेतन : कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्रता

अ) विधवा- हयात असेपर्यंत पुर्नविवाह झाला तरी.

ब) विधुर हयात असेपर्यंत अथवा पुर्नविवाहाची तारीख यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत

क) मुलाच्या बाबतीत त्याच्या वयाच्या २१ वर्षांपर्यंत

ड) मुलीच्या बाबतीत तिच्या वयाच्या २४ वर्षांपर्यंत किंवा तिचा विवाहाचा दिनांक यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत

इ) मनोविकृती / मानसिक दुर्बलता / विकलांगता असणाऱ्या अपत्यास हयात भर कुटुंबनिवृत्तीवेतन मिळेल.

 (जिल्हा शल्य चिकीत्सकाचे प्रमाणपत्र व उपजिवीका करण्यास असमर्थ असल्याचे खात्री होण्याच्या अधीन राहून) 

  (शा.नि. वित्त विभाग दि. ०८/१०/२०१८)

ई) एकुलता एक अविवाहीत कर्मचाऱ्याचे आई वडील जर त्याचेवर पुर्णपणे अवलंबून असल्यास त्यांना अनुज्ञेय

* घटस्फोट झाल्यावर अनुज्ञेय नाही.

* न्यायिक फारकतीचे काळात अनुज्ञेय

* वैवाहिक जोडीदार अपात्र असला तरी अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन देता येते.

* द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू नसलेल्या कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नींना समप्रमाणीत वाटप

* अन्य प्रकरणात फक्त कायदेशीर पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय (शासन निर्णय वित्त विभाग दिनांक ३/११/२००८)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees