शेक्षणिक वर्ष  २०२३-२४
  Polytechnic डिप्लोमा  ला प्रवेश घेण्यासाठी कागदपत्र (documents)नसल्या  मुळे  अडचण येत आहे का?... तर  एक हमीपत्र जोडून आपण  आपली नोंदणी करू शकता ... 


 शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत पदविका(Polytechnic Diploma) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता इयत्ता दहावीनंतरचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम (Polytechnic Diploma) , इ.बारावीनंतरचे औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटींग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आणि बारावी/आयटीआय नंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका(Direct Second  Year Polytechnic) अभ्यासक्रम असे पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रिया माहे जून २०२३ पासून सुरु आहे. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करतांना उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे उमेदवार अर्ज सादर करु शकले नाहीत. त्यामुळे अर्ज नोंदणी करण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापही नोंदणी केलेले बरेचसे उमेदवार हे आवश्यक प्रमाणपत्रे मिळालेली नसल्यामुळे अर्ज निश्चित करु शकलेले नाही

 

शासन पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ करीता पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी जात/ जमात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील द्वितीय फेरीच्या प्रवेश निश्चितीच्या अंतिम दिनांकापर्यंत देण्यात येत आहे. 

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees