रजेचे प्रकार:-Leave Types Maharashtra State Government Employees

रजेचे प्रकार:-

१] अर्जित रजा:-

१. प्रत्येक कैलेंडर वर्षामध्ये १ जानेवारी व १ जुलै रोजी प्रत्येकी १५ दिवस जमा.

२. कोणत्याही कारणासाठी.

३. विहीत नमुन्यात अर्ज असावा.

४. एका वेळेस जास्तीत जास्त १८० दिवसापर्यंत मंजूर करता येते.

५. जास्तीत जास्त ३०० दिवस मर्यादेत साठविता येते.

६. सेवानिवृत्ती, मृत्यू या दिवशी शिल्लक रजेचे रोखीकरण अनुज्ञेय. राजीनामा प्रकरणी शिल्लक रजेच्या  

   ५०% रजेचे रोखीकरण.

 

७. असाधारणा रजा, निलंबन अकार्यदिन या प्रकरणी १/१० दराने

८. रजा कालावधीत कर्तव्य कालावधीतील वेतन व कर्तव्याशी रजा कपात.

   निगडित पूरक भत्ते दिले जातात.

 

२] अर्धवेतनी रजा:-

१. प्रत्येक कैलेंडर वर्षाच्या १ जानेवारी १ जुलै रोजी प्रत्येकी १०

   दिवस आगावू जमा.

२. साठवणुकीला मर्यादा नाही,

३. रजा कालावधीत मूळ वेतनाच्या निम्या दराने वेतन व या वेतनाला देय भत्ते.

४. पूर्ण कॅलेंडर महिन्याच्या ५/३ दराने जमा केली जाते. अकार्यदिन, निलंबन या कालावधीसाठी १/१८ दराने   

   कमी केली जाते.

५. या रजेसाठी विहीत नमुन्यांत (परि.-५ नमुना १) मध्ये अर्ज आवश्यक.

६. सेवानिवृत्ती, मृत्यू अशा प्रसंगी रोखीकरण करता येते.

 

३]परिवर्तित रजा

१. वैद्यकिय प्रमाणपत्राच्याआधारे पुढील अटींच्या अधीन राहून देता येते.

अ) रजा कालावधीच्या दुप्पट अर्धवेतनी रजा खर्च.

ब) पूर्ण दराने रजा वेतन.

क) रजा संपल्यावर परत कामावर येण्याची खात्री आवश्यक.

ड) रजा संपल्यावर रुजू न झाल्यास सर्व रजा अर्धवेतनी व अतिप्रदान वसुली.

इ) वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय :

Ø  प्रसूती रजेला जोडून ६० दिवस.

Ø  उच्च अभ्यासक्रमासाठी ९० दिवस.

Ø  विपश्यनेसाठी १४ दिवस, तीन वर्षातून एकदा, सेवेमध्ये वेळा.

Ø  शिक्षकांना प्रत्येक सहामाहीसाठी १० दिवस अर्धवेतनी किंवा ५ दिवस परावर्तित.

 

 

 

] ना देय किंवा अनर्जित रजा:-

 

१. कोणतीही रजा शिल्लक नसतांना मात्र कर्मचारी रजा संपल्याव परत येण्याची खात्री असल्यास.

 २. अर्धवेतनी रजेच्या मर्यादित एका वेळेस १८० दिवस व संपूर्ण  ३६० दिवस मंजूर करता येते.

३. अस्थायी व कंत्राटी कामावरील महिला कर्मचाऱ्यास  सेवासमाप्तीनंतर पुढील दोन वर्षाच्या सेवेच्या हमीपत्राच्याधारे देता येते.

४. शा. नि. २६.१०.९८ नुसार एकच हयात अपत्य असलेल्या महिल कर्मचान्यास दत्तक मूल घेण्यासाठी देता येते.

५. संपूर्ण सेवेत ४५ दिवस गर्भपातासाठी रजा देता येते.

 

६. शा. नि. १५/०१/२०१६ नुसार स्थायी अस्थायी कर्मचारी अि रजे एवढे वेतन देय.

७. शा. नि. १५/०३/२०१७ नुसार अर्जित रजाही बालसंगोपनासाठी देव ८. रजा कालावधीत अर्धवेतनी दराने वेतन.

९. रजा संपल्यावर परत रुजू न झाल्यास वेतन वसुली.

१०. फक्त कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांना देय.

५] असाधारण रजा:-

१. कोणत्याही रजा खाती रजा शिल्लक नसल्यास किंवा पुरेशी रजा शिल्लक असूनही कर्मचाऱ्याची तशी लेखी मागणी असल्यास.

अ) तीन वर्षाच्या सेवेनंतर सहा महिन्यापर्यंत.

ब) पाच व सेवेनंतर १२ महिन्यांपर्यंत.

क) क्षयरोग, कुष्ठरोग, आजार १२ महिने

ड) कर्करोग, मानसिक आजार १८ महिने.

इ) तीन वर्षाच्या सेवेनंतर उच्च अभ्यासक्रमासाठी २४ महिने.

फ) या रजेमध्ये रजा वेतन नाही, मात्र सक्षम अधिकाऱ्यांच्या घरभाडे व स्थानिक पूरक भत्ता देता येतो.

ज) खाजगी कारणास्तव ६ महिन्यापेक्षा जास्त कालवधीच्या र प्रकरणी वार्षिक वेतनवाढ पुढे. तसेच खाजगी कारणास्तव रजेचा  कालावधी अर्हताकारी सेवेतून कमी केला जातो.

 

६]विशेष विकलांग रजा किंवा झालेली इजा:-

 

१. कर्मचारी आपले नेमून दिलेले कर्तव्य बजावत असता, त्यामुळे किंवा जाणून बुजून झालेली इजा

 

२. अशी घटना तीन महिन्यांत स्पष्ट होणे अपेक्षित, मात्र अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निर्णयाव्दारेविलंब माफ करता येते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees