राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२.(maharashtra state government employee group insurance scheme- GIS)

 

 


राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२.

१)      शा.नि.वि.वि.क्र.डी.ओ.आय.२०८१/४७०१/एडीम.५ दि.२६ एप्रिल,१९८२ अन्वये लागू,

२)      दि.१ मे १९८२ ला सेवेत असलेल्या सर्व कर्मचा-र्यांना त्याच दिवशी सदस्यत्व,

३)      त्या नंतर वर्धापन दिनांकापासून (जर नियुक्ती २ जाने.नंतर असेल तर),

४)      अशदान सक्तीचे,

५)      अंशदानाचे  दर शासनादेशाप्रमाणे,

६)      दि.१ जानेवारी २०१६ पासून सुधारितखालील प्रमाणे.

स्तंभ १

स्तंभ २

स्तंभ ३

स्तंभ ४

वर्ग.

दिनांक १ जानेवारी  २०१६ रोजी नियमित सेवेत असलेल्या कर्मचा-याच्या मासिक

वेतनातून वसूल करावयाची वर्गणी (र.)

दिनांक २ जाणे.२०१६ आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी कोणत्याही महिन्यात नव्याने प्रविष्ट झालेल्या वक पात्र असलेल्या (माहे डिसेम्बर पर्यंत)वसूल करावयाच्या केवळ विमा संरक्षणाचा हप्ता (रु).

सेवेत असतांना कर्मचा-याला मृत्यु आल्यास कुटुंबियांना देय होणारी विम्याची रक्कम.(रु).

गट “अ”

९६०(नउशे साठ)

३२०(तीनशे वीस)

९,६०,००० (नऊ लाख साठ हजार)

गट “ब”

४८० (चारशे ऐंशी)

१६० (एकशे साठ)

४,८०,००० (चार लाख ऐंशी हजार)

गट “क ”

२४० (दोनशे चाळीस)

 ८० (ऐंशी)

२,४०,००० (दोन लाख चाळीस हजार)

गट “ड ”

१२० (एकशेवीस)

 ४० (चाळीस)

१,२०,००० (एक लाख वीस हजार)

 

 

७)      वर्धापन दिनांकापर्यंत विमा निधी दराने किमान ४० कमाल ३२०,

८)      वर्धापन दिनांकास सभासदत्व आणि त्या तारखेपासून वर्गणीमध्ये वाढ,

९)      पदोन्नती झाल्यावर पुन्हा सभासदत्व आणि वर्धापन दिनापासून वर्गणीमध्ये वाढ,

१०1)  वाढलेली वर्गणी कमी होत नाही,

2१2)  सभासदत्व देण्या पूर्वी मृत्यू आल्यास विमा निधी परंतु सभासद केले असे समजून,

१२3)  सभासदत्व दिल्यावर विमा निधी सोबत बचत निधी सुद्धा.(दुहेरी लाभ),

१३4)  निवृत्ती,सेवा सोडून जाणे,सेवेतून काढून टाकणे,इ.प्रकरणी वचत निधी,(एकेरीलाभ)

१४5)  शोधूनही सापडत नाही असा पोलीस अहवाल असल्यास १ ल्या १२ महिन्यात बचत निधीचे पेमेंट वारसास आणि पुढील ६ वर्षे जीवंत परत न  आल्यास वारसास विमा निधी जिवंत होऊन परत आला आणि आपल्या हक्काचे पेमेंटची मागणी करीत असल्यास पुन्हा पेमेंट नाही.

१५6)  रकम काढता न येण्या सारखी. मात्र नोंदणीकृत संस्थाना घरबांधणी अग्रिम करता पात्र.

१६7)  अंतिम प्रदान जी.आर.प्रमाणे. व्याजासह.

१७8)  पदोन्नतीमुळे  वर्गणीमध्ये वाढ झाल्यास वर्धापन दिनांकापासून जेवढ्या युनिताने वर्गणी

मध्ये वाढ झाली असेल त्या प्रमाणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees